الأحد، 20 كانون2/يناير 2019

HDFC बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांच्या हत्येचं गूढ उकललं...

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ संघवी बेपत्ता होते. याप्रकरणी नवी मुंबईतल्या कोपरखैरणेतून अटक करण्यात आलेल्या आरोपीने हत्या करून त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली आहे.

नवी मुंबई गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे.

काय घडलं नेमकं?

 • 5 सप्टेंबरला बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थ संघवी घरी पोहचले नाहीत.
 • मुंबईतील ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात संघवी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
 • नवी मुंबई पोलिसांना गुरुवारी दुपारी कोपरखैरणे रेल्वे स्टेशन लगत असलेल्या निर्जन स्थळी त्यांची कार बेवारस स्थितीत सापडली.
 • आरोपीला पैशांची गरज असल्याने सिद्धार्थ संघवी यांच्याकडे पैशाची मागणी केली होती.
 • कमला मिलमध्येच आरोपीने सिद्धार्थ संघवींची हत्या केली.
 • त्यानंतर मृतदेह नष्ट करण्यासाठी तो कल्याणला घेऊन गेला.
 • नंतर नवी मुंबई परिसरात गाडी उभी केली.
 • आरोपीने संघवी यांच्या वडिलांना फोन केला- तुमचा मुलगा सुखरुप आहे काळजी करू नका 
 • आरोपीकडून संघवी यांचा मोबाईल सापडला आहे.

कोण आहे हा आरोपी?

 • नवी मुंबई पोलिसांनी पकडलेला आरोपी सरफराज शेख हा मूळचा उत्तर प्रदेशचा
 • तीन वर्षांपूर्वी कमला मिलमध्येच फॅब्रीकेशनचे काम करत होता.
 • त्यानंतर एच डी एफ सी मधेच ड्रायविंगच काम करत होता.
 • तेथील नोकरी सोडून तो काही काळ ओला कार चालवत होता.
 • मात्र चार महिन्यांपूर्वी पुन्हा तो कमला मिलमध्ये कामास लागला होता. 
loading...

Top 10 News

19 كانون2/يناير 2019

राशी भविष्य