الأربعاء، 21 تشرين2/نوفمبر 2018

फेसबुक लाईव्ह करत मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

भाजपचे राम कदम यांनी दहीहंडी उत्सवादरम्यान महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर निगडीमधील एका शिक्षकाने बीड लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रितम मुंढे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले.

यावरून 5 ते 6 जणांनी फेसबुक लाईव्ह करत मारहाण केली, त्यामध्ये त्यांनी शिक्षकाला माफी मागण्यास सांगितली आणि त्यानंतर शिक्षकाला मारहाण केली. 

संजय कुऱ्हाडे,असे मारहाण झालेल्या शिक्षकांचे नाव आहे.

याप्रकरणी निगडी पोलिसांनी संतोष बडे, राजेश मुंडे, विशाल देशमुख, श्रीकांत मुंडे, शुभम मुंडे, गणेश कराडसह त्याच्या 6 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाण का करण्यात आली?

  • भाजपा आमदार राम कदम यांच्या वादग्रस्त विधानावर मंत्री पंकजा मुंडे यांनी मध्यंतरी एक ‘राम कदम केवळ बोलले. ते तसे काही करत नाहीत, करणार नाहीत’ अशा आशयाची फेसबुकवर पोस्ट केली.
  • या पोस्टवर पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षक असलेल्या संजय यांनी कमेंट केली. त्यामध्ये ‘तुमची बहीण खासदार प्रितम मुंढे अविवाहित आहे, तिला पळवून नेले तर चालेल का? अशा आशयाची पोस्ट केली.
  • त्यावर आरोपींनी संजय आणि त्यांच्या पत्नीचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करून त्यावर अश्लील कमेंट्स केल्यानंतर आरोपींनी संजय यांना निगडी येथील निवेदिता बँकेसमोर बोलावून घेतले.
  • त्यांनंतर फेसबुक लाईव्ह सुरू केलं आणि आधी पोस्ट केलेल्या वक्तव्याची माफी मागायला लावली नंतर शिवीगाळ करत मारहाण केली.
  • यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याबाबत निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत
loading...

Top 10 News

राशी भविष्य