الأربعاء، 16 كانون2/يناير 2019

अशुभ '13' अंकाशी वाजपेयींचं खास नातं

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

देशात 3 वेळा प्रधानमंत्री पदाची शपथ घेणा-या अटल बिहारी वाजपेयींसाठी 13 या अंकाशी अत्यंत जवळचं नातं होतं.

ज्या अंकाला सगळ्या जगात अशुभ मानलं जातं. त्याच अंकाचं वाजपेयींना मात्र आकर्षण होतं. 

वाजपेयी जेव्हा एखाद्या हॉटेलला जात, तेव्हा तेथे ते कायम 13 वा मजला किंवा 13 क्रमांकाची रूमच शोधायचे.

abv.jpg

पहिल्यांदा 1996 मध्ये जेव्हा ते प्रधानमंत्री बनले, तेव्हा त्यांचं सरकार 13 दिवसच चाललं.

1996 मध्ये ‘13 मे' या दिवशीच वाजपेयींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती.

दुसऱ्यांदा 1998 मध्ये वाजपेयी पंतप्रधान बनले आणि तेव्हा त्यांचं सरकार 13 महिनेच चाललं.

यानंतर 13 महिन्यांचाच काळ उटल्यानंतर ते पुन्हा सत्तेत परतले, आणि 13 घटक पक्षांना एकत्र आणत त्यांनी सरकार बनवलं.

वाजपेयींनी पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली ती 13 ऑक्टोबर 1999 रोजी. यानंतर त्यांनी आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.

आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत करण्यात आलेल्या अणु चाचण्या 11 आणि 13 मे या दिवशीचं करण्यात आल्या होत्या.

 

pokharan.jpg

अनेक सहका-यांनी 13 हा अंक अशुभ असल्याचं सांगूनही वाजपेयी मात्र 13 या या अंकाला लकी मानत.

2004 च्या निवडणूकीत मात्र 13 हा अंक त्यांच्यासाठी लाभदायक ठरला नाही.

यावेळी वाजपेयींनी या निवडणुकीसाठी आपलं नाव दाखल केलं ते 13 एप्रिलला आणि 13 मे ला झालेल्या मतमोजणीतच त्यांना आपलं पद गमवावं लागलं होतं.

 


वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना!
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द...

निरोप एका युगाला...

वाजपेयींना अखेरचा निरोप - Pics

वाजपेयींच्या अंत्यदर्शनाला आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण...

वाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी

वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, नगरसेवकाला मारहाण

राज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे अटलजींना श्रद्धांजली...

जाणून घ्या वाजपेयींच्या संपत्तीबद्दल...

वाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित...

वाजपेयींचे मराठी प्रेम

वाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल...

अशुभ '13' अंकाशी वाजपेयींचं खास नातं

वाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार...

वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना!

भारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर...

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द...

अटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरात प्रार्थना, देशातील सर्व नेते एम्समध्ये दाखल...


loading...

Top 10 News

राशी भविष्य