الأربعاء، 16 كانون2/يناير 2019

अक्षय कुमारच्या ‘केसरी’ चित्रपटाचा पहिला लूक

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने बहुतेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या अनेक भूमिका लोकप्रिय झाल्या आहेत. आता अक्षय एका नव्या रूपात ‘केसरी’ या चित्रपटात दिसणार आहे.

केसरी या चित्रपटांचा पहिला पोस्टर करन जोहरने व्टिटरवर पोस्ट केला. या पोस्टरमध्ये अक्षय कुमार एका शिखच्या पोशाखात दिसत आहे. विरोधकांचा सामना करण्यास अक्षयसह इतर शीख बांधवदेखील दिसून येत आहे.

 

 या चित्रपटाची कथा 1897 मध्ये ब्रिटिश इंडियन आर्मी आणि अफगाण-पश्तो मिलिट्री यांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धावर आधारलेली आहे.  हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच 21 मार्च 2019 मध्ये प्रदर्शित होणार आहे. करनने सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा लूक बघून प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Jan 16 07:53:09 +0000 2019

अरुण जेटलींना कॅन्सरचं निदान बजेटला मुकणार ? वाचा सविस्तर - https://t.co/QBQt0kPpA6 #ArunJaitley #Budget2019… https://t.co/QcIbUZiKP6
Jai Maharashtra News
Wed Jan 16 07:25:21 +0000 2019

अखेर बेस्ट संपावर तोडगा निघाला 8 दिवसांनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे वाचा सविस्तर - https://t.co/QEks9HmvJi… https://t.co/EIrisBh5Kh