السبت، 17 تشرين2/نوفمبر 2018

'मुंबई अँथम'वरून 'महागुरू' ट्रोल!

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील ख्यातनाम सचिन पिळगावकर यांना गेल्या काही दिवसांपासून नेटिझन्सच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. याचं कारण म्हणजे 'आमची मुंबई- द मुंबई अँथम' हे व्हिडिओ साँग. यूट्युबवर प्रदर्शित झालेल्या या गाण्याचे शब्द आणि काहीशा अश्लीलतेकडे झुकणारं नृत्य. विशेष म्हणजे अशा प्रकारचं गाणं हे सचिन पिळगावकर यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. गाण्याला आवाजही त्यांचाच आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. तर नेटिझन्सनी या व्हिडिओबद्दल त्यांना ट्रोल करायला सुरूवात केली आहे.

काय आहे असं या गाण्यात?

या व्हिडिओ अल्बममध्ये मुंबईच्या झगमगाटी दुनियेचं वर्णन आहे.
मात्र गाण्याचे संगीत दिग्दर्शन, नृत्यदिग्दर्शन आणि चित्रिकरण अत्यंत सुमार आहे.
तसंच गाण्याच्या चित्रिकरणातील काही प्रसंग आणि स्टेप्स हीन अभिरूचीच्या वाटत आहेत.
या माण्यात काही डान्सर आणि एका तंग कपड्यातल्या मुलीसोबत सचिन पिळगावकर थिरकताना दिसत आहेत
या गाण्याला आवाजही त्यांचाच आहे.
गाण्याचे शब्द महम्मद अकील याचे आहेत, तर नृत्यदिग्दर्शन डीसी द्रविड याचं आहे.
हे गाणं 'शेमारू बॉलिगोली' या अकाऊंटवरून पब्लिश करण्यात आलं.

महागुरू झाले ट्रोल

या गाण्यामुळे सचिन पिळगावकर यांना नेटिझन्सनी ट्रोल करायला सुरुवात केली.
काहींनी तर अक्षरशः या व्हिडिओला शिव्या घातल्या आहेत.
गाणं मुंबईबद्दल असूनही मुंबई कुठेच दिसत नसल्याचं टर्र काहींनी उडवली आहे.
तर काहींनी हे गाणं पाहून मुंबई सोडून केरळ गाठायचा निर्णय घेतला आहे.
भोजपुरी गाण्यांच्या चित्रिकरणापेक्षाही हे गाणं वाईट असल्याचं काही नेटिझन्सनी म्हटलं आहे.
मराठी सिनेसृष्टीला येऊ घातलेले सुवर्णदिन जाऊन अशा गाण्यामुळे मराठी सिनेसृष्टीला पुन्हा तांब्या-पितळ्याचे दिवस येतील, अशी टीकाही लोकांनी केली आहे...

'महागुरूं'चं स्पष्टीकरण!

'आमची मुंबई' या गाण्यावरून लोकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर पिळगावकर यांनी आपल्या चाहत्यांची माफी मागितली आहे. आपल्या एका जुन्या कॉस्च्युम डिझायनरसाठी आपण या गाण्यात सहभागी झाल्याचं त्यांनी म्हटलंय. हे गाणं चांगल्या दर्जाचं नसणार याची कल्पना आपल्याला शुटिंगच्या वेळी आली, मात्र आपण आयत्यावेळी नकार दिला, तर निर्माते, दिग्दर्शक यांचं नुकसान होईल या जाणिवेतून हे गाणं पूर्ण केल्याचं सचिन यांनी म्हटलंय. हे गाणं सोशल मीडियावर रिलिज होऊ नये, अशीच आपली मनोमन इच्छा होती, मात्र हे गाणं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट झालंच. मात्र पिळगावकर यांनी लोकशाहीचा हवाला देत हे गाणं काढून टाकायचं दडपण आपण म्युझिक कंपनीवर आणणार नसल्याचं म्हटलं आहे.

विशेष म्हणजे या पोस्टनंतर अवघ्या काही तासांतच हे गाणं शेमारू बॉलिगोलीच्या पेजवरून काढून टाकण्यात आलं आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य