الأربعاء، 23 كانون2/يناير 2019

अबब! त्यांनी चक्क बंगलाचं उचलला...

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

आपली कार पंक्चर झाली तर तिला जॅक लावून उचलेले आपण अनेकदा बघितले आहे. मात्र त्याच पद्धतीने कुणी बंगला उचलला तर निश्चितच आश्चर्य वाटेल. पुणे शहरातील बी. टी. कवडे रस्ता येथील तारदत्त कॉलनी या ठिकाणी असणाऱ्या 'भारद्वाज' नावाच्या बंगल्याची उंची चार फुटाने वाढवण्यात आली आहे.

वाहनांच्या दुरुस्तीसाठी 'जॅक' लावल्याचे चित्र आपण नेहमी पाहतो, मात्र 2000 स्क्वेअर फुटच्या बंगल्याला तब्बल 250 जॅक लावून बंगल्याची उंची 4 फूट वाढविण्यात आली आहे.

भारद्वाज हा बंगला अनेक वर्षांपूर्वी बांधला होता. तेथील परिसरात अनेक विकासकामे झाली, तसेच इथल्या रस्त्यांची उंचीही वाढली आणि त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरचे पाणी घरात येत होते.

तब्बल दीड फूट पाणी घरात शिरल्याने बंगला मालक त्रस्त झाले. त्यावर उपाय काढण्यासाठी ऑनलाईन सर्च करत असताना त्यांनी 'हाऊस लिफ्टिंग' या पर्यायाबद्दल वाचले आणि हरियाणाच्या एका ठेकेदाराला हे काम करण्यास दिले.

बंगल्याची उंची वाढवण्याचे काम पुढील 3 महिन्यांत पूर्ण होणार असून त्याचा बंगल्याला नैसर्गिक आपत्तीशिवाय कोणताही धोका नाही, असा दावा ठेकेदाराने केला आहे.

loading...